Ahmednagar Crime: अहिल्यानगरमध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. येथील श्रीरामपूर शहरात 11 वर्षीय अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे.
नऊ जणांनी मिळून या अल्पवयीन मुलासोबत हे कृत्य केले असून अत्याचार करणारे देखील अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती समोर आलीये.
अत्याचार प्रकरणी पीडित मुलाच्या आईने दिलेल्या फिर्यादीवरून श्रीरामपूर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना ताब्यात घेण्यात आलंय.
मिळालेल्या माहितीनुसार, 11 वर्षीय वर्षीय अल्पवयीन मुलास धमकावून हा अनैसर्गिक अत्याचार करण्यात आला. पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.