spot_img
अहमदनगरशहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

शहर पुन्हा हादरलं! छत्तीसगडच्या अमनला नगरात संपवल; कारण आलं समोर..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री:-
बिगारी काम करणार्‍या परप्रांतीय युवकाच्या पोटात चाकूने वार करून त्याचा खून केल्याची घटना तपोवन रस्त्यावरील ढवण वस्तीवर मंगळवारी रात्री साडेनऊच्या सुमारास घडली. अमन हरीचंद्र सतनामी (वय २१ मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. सद्गुरू टॉवर, सुनील ढवण यांच्या विटभट्टीजवळ, तपोवन रस्ता) असे मयत युवकाचे नाव आहे. शिवीगाळ करू नको, असे म्हणाल्याच्या रागातून ही घटना घडली आहे. या प्रकरणी खूनी परप्रांतीय युवक मनीष ऊर्फ पुकु तिरीथ निशाद (मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) याच्याविरूध्द तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे.

हेमंत रमेश भरव्दाज (वय २४ मुळ रा. छत्तीसगड, हल्ली रा. तपोवन रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे कुटुंबासह सुनील ढवण यांच्या विटभट्टी जवळ राहतात. त्यांच्या शेजारील खोलीत त्यांचा आत्याचा मुलगा अमन हरीचंद्र सतनामी तसेच दुसर्‍या खोलीत रामजी बलवंत निशाद व त्यांचा नातू मनीष ऊर्फ पुकु तिरती निशाद हे राहतात. ते सर्व जण बिगारी काम करतात. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास फिर्यादी व त्यांच्या घरातील सर्व जण जेवण करून घराबाहेर बसलेले होते. त्यावेळी शेजारी राहणारा मनीष निशाद मोठ मोठ्याने शिवीगाळ करत होता.

त्यामुळे फिर्यादीच्या आत्याचा मुलगा अमन हा मनीष याला तू मोठ्याने शिवीगाळ करू नकोस, आमच्या घरात महिला आहेतफ असे म्हणाला. त्याने अमन यांना देखील शिवीगाळ केले व घरात जावून चाकू आणला व तो अमन यांच्या पोटात मारून त्यांना जखमी केले. सदरची घटना घडल्यानंतर मनीष हा जवळच असलेल्या ऊसातून पळून गेला. जखमी अमन यांना फिर्यादी व त्यांच्या नातेवाईकांनी सावेडीतील खासगी रूग्णालयात दाखल केले. तेथे डॉटरांनी त्यांच्यावर उपचार सुरू केले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...