Crime News: १५ वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एसटी बसची वाट पाहत असलेल्या विद्यार्थिनीला गावी सोडण्याच्या बहाण्याने दुचाकीवर लिफ्ट देऊन आरोपीने तिला जंगलात नेले आणि अत्याचार केला.
अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा गावातील पीडित विद्यार्थी अमरावती येथील नवव्या वर्गात शिकते. शनिवारी सायंकाळी, एसटी बस स्टँडवर ती उभी होती. याच दरम्यान, गावाचा सरपंच पुत्र तिच्या जवळ आला आणि तिला गावी सोडण्यासाठी दुचाकीवर लिफ्ट देण्याचे सांगितले. प्रारंभात तिने नकार दिला परंतु त्याने तिच्या कुटुंबाला मोबाईलवर संपर्क साधून त्या बाबत माहिती दिली.
आरोपीने तिच्या विश्वासाचा फायदा घेत, तिला गावाच्या बाहेर जंगलात नेले आणि तिथे तिच्यावर अत्याचार केला. घटनेची माहिती मिळताच अमरावती पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. या घटनेने परिसरात संतापाची लाट पसरली असून, पोलिसांनी पुढील कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.