अहमदनगर। नगर सहयाद्री-
शेतात गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार नगर जिल्ह्यातील पोखडी गावामध्ये घडला. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसांनी दमदार कामगीरी करत लाख भर रुपये किंमतीचा ३७ किलो गांजा जप्त केला असून पैशांच्या हव्यासापोठी गांजा लागवड करणाऱ्या आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. यादव नाना साबळे ( रा. पोखडी ता जि. अहमदनगर )असं या शेतकऱ्याच नाव आहे.
अधिक माहिती अशी: गांजाचे वितरण तसेच उत्पादनावर बंदी असूनदेखील या शेतकऱ्याने अवैध पद्धतीने गांजाची शेती पोखडी गावामध्ये केली होती. या कारनाम्याची गुप्त माहिती एमआयडीसी पोलिसांना समजली. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकत लाख भर रुपये किंमतीचा ३७ किलो गांजा जप्त केला असून शेती मालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
सदरची कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलीस अधिकारी संपतराव भोसले, यांच्या मार्गदर्शानाखाली पोनि अरुण आव्हाड, सपोनि माणिक चौधरी, पोसई मनोज मोंढे, नितीन उगलमुगले, नंदकिशोर सांगळे, राजु सुद्रिक, कावरे, दिवटे, महमद शेख, महेश बोरुडे, चालक गिरवले, किशोर जाधव, नवनाथ दहिफळे, जयसिंग शिंदे, उमेश शेरकर,वंजारी यांच्या पथकाने केली आहे.