Breaking news: बिहारच्या सुपौल येथील कोसी नदीवर बांधण्यात येत असलेल्या देशातील सर्वात मोठ्या पुलाचा शुक्रवारी पहाटे ७ वाजेच्या सुमारास गर्डर कोसळला आहे. यामध्ये एका कामगाराचा मृत्यू झाला असून अनेकजण ढिगार्याखाली दबल्याची माहिती आहेत. सध्या घटनास्थळी बचावकार्य सुरू असून आतापर्यंत ७ जणांना बाहेर काढण्यात आले आहे.
बिहारच्या सुपौलमधील बकौर आणि मधुबनीतील भेजा घाट दरम्यान देशातील सर्वात मोठा पूल बांधला जात आहे. या पुलाची लांबी जवळपास ११ किलोमीटर इतकी असून यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात येत आहे.
शुक्रवारी (ता. २२) पहाटे काम सुरू असताना अचानक पुलाच्या ५०, ५१ आणि ५२ क्रमांकाच्या पिलरचे गर्डर उखडून खाली कोसळले. यामध्ये जवळपास २० मजूर ढिगार्याखाली गाडले गेले. आतापर्यंत आठ मजुरांना सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं आहे.