मुंबई। नगर सहयाद्री
विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरवात आज गुरुवार पासून सुरवात होत असून १४ व्या विधानसभेचे हे शेवटचे अधिवेशन आहे. शुक्रवारी राज्याचा अंतरिम अर्थसंकल्प सादर होणार आहे. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या यशामुळे विरोधी बाकांवरील महाविकास आघाडी आक्रमक असून, लोकसभेतील निराशाजनक कामगिरीमुळे सत्ताधारी महायुती बचावात्मक पवित्र्यात पाहायला मिळत आहे.
सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडण्याचे सर्वतोपरी प्रयत्न विरोधकांतर्फे केले जाणार असून पहिल्याच दिवसापासून विधिमंडळाच्या पायऱ्या आणि दोन्ही सभागृहांत विरोधकांची आक्रमक भूमिका पाहायला मिळेल, अशी शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे पडसाद या अधिवेशनात जाणवणार आहेत.
लोकसभा निवडणुकीमुळे राज्य सरकारला पहिल्यांदा २७ फेब्रुवारीस अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागला होता. आता राज्यात सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यात विधानसभेची निवडणूक होत असल्याने दुसऱ्यांदा अंतरिम अर्थसंकल्प सादर करावा लागणार आहे. शुक्रवारी दुपारी दोन वाजता विधिमंडळात अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे. शुक्रवारच्या अर्थसंकल्पात कर्जमाफीची घोषणा होईल की शेतकऱ्यांना खूश करण्यासाठी अन्य काही उपाययोजना केल्या जातील, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.
अक्रमक विरोधक सत्ताधाऱ्यांना ‘या’ प्रश्नांवर घेरणार
पॉर्शे कार अपघात प्रकरण
घाटकोपर होर्डिंग दुर्घटना
मराठा विरुद्ध ओबीसी वाद
पुण्यातील अंमली पदार्थांचे रॅकेट
कापूस सोयाबीनचे कोसळलेले भाव
पावसाचा खंड पडल्याने राज्यात निर्माण झालेली परिस्थिती
राज्यांतील कायदा आणि सुव्यवस्था