spot_img
अहमदनगरमहाविद्यालयाच्या गेटसमोर घडला 'धक्कादायक' प्रकार? त्याने तिला अडवले आणि..

महाविद्यालयाच्या गेटसमोर घडला ‘धक्कादायक’ प्रकार? त्याने तिला अडवले आणि..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
येथील एका महाविद्यालयच्या गेटसमोर १७ वर्षीय विद्यार्थिनीला अडवून तिची छेडछाड केल्याचा धक्कादायक प्रकार आहे. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यातदिलेल्या फिर्यादीनुसार एका तरुणा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कृष्णा किरण कांबळे (रा. प्रबुद्ध नगर, भिंगार) असे या गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे.

अधिक माहिती अशी: १२ जुलै रोजी १७ वर्षीय विद्यार्थिनी नेहमी प्रमाणे लालटाकी परिसरातील एका महाविद्यालयात गेली होती. दुपारी ४ वाजता परतत असताना महाविद्यालयाच्या गेटसमोर आरोपी कृष्णा कांबळे याने तरुणीला अडवले तुझ्याशी बोलायचे आहे. मला तुला भेटायचे आहे, माझ्या सोबत चल असे तो म्हणाला.त्यास त्या तरुणीने नकार दिल्यावर त्याने तिचा हात पकडून तिच्या सोबत छेडछाड केली.

विद्यार्थिनी सदर प्रकरणामुळे खूप घाबरली होती. तिने भितीपोटी घरी कुणाला ही काही सांगितले नाही. भीती कमी झाल्यावर तिने कुटुंबियांना घडलेला प्रकार सांगितला. त्यानंतर शुक्रवारी दि. १९ जुलै रोजी कुटुंबियांनी पोलीस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी आरोपी कृष्णा कांबळे विरुद्ध पोक्सो सह विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...