सिंधुदुर्ग । नगर सहयाद्री:-
सिंधुदुर्ग मधील मालवण येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळल्याची संतापजनक घटना घडली आहे.
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राजकोट येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं होते. मात्र हा पुतळा दुर्देवाने कोसळल्याची घटना घडली आहे. पुतळा कोसळण्यामागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.
४ डिसेंबर २०२३ रोजी मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा सलाम म्हणून हा पुतळा उभारण्यात आला होता. मात्र वर्षभरातच हा पुतळा कोसळल्याचा प्रकार उघडकीस आला.
नौदल दिनानिमित्त सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथे कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी पंतप्रधान मोदींच्या हस्ते या भव्य पुतळ्याचं अनावरण करण्यात आले होते. हा पुतळा कोसळण्यामागे कारण काय हे अद्याप कुणी प्रशासकीय अधिकारी सांगत नाही.