spot_img
अहमदनगरधान्य संघटनेच्या 'त्या' मागणीला यश! राज्य सरकारने दिले 'मोठे' आदेश

धान्य संघटनेच्या ‘त्या’ मागणीला यश! राज्य सरकारने दिले ‘मोठे’ आदेश

spot_img

सुपा | नगर सह्याद्री:-
राज्यातील स्वस्त धान्य दुकानात सर्व्हर समस्येमुळे येणार्‍या अडचणी लक्षात घेता केंद्र शासनाने माहे. जुलै महिन्याचे धान्य हे ऑफलाइन देण्याची निर्देश मेलद्वारे सर्व पुरवठा विभागांना दिले आहे. स्वस्त धान्य संघटनेचे सचिव रमेश गवळी यांनी ही माहिती दिली आहे.

सरकारमान्य स्वस्त धान्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने आझाद मैदानावर क्रांतिकारक दिन सर्व स्वस्त धान्य दुकानाच्या समस्या सोडवण्यासाठी महाराष्ट्र राज्यातून सर्व संघटनेचे पदाधिकारी आणि स्वस्त धान्य दुकानदार यांच्या वतीने आंदोलन छेडण्यात इशारा देण्यात आला होता. या आंदोलनाच्या घोषणेनंतर तातडीने सरकारने कारवाई करत जुलै महिन्याचे धान्य ऑनलाईन देण्याचे निर्देश दिले आहे.

राज्यात सार्वजनिक वितरण व्यवस्थेचे संगनीकरण प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. त्यानुसार राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील लाभार्थ्यांचे बायोमेट्रिक ओळख पटवून अन्नधान्य वितरण करण्याकरिता स्वस्त धान्य दुकानांमध्ये फोर जी तंत्रज्ञान असलेल्या ई- पॉश मशीन बसवण्यात आले आहेत. राज्यात काही दिवसापासून स्वस्त धान्य दुकानातील ई-पॉस मशीन मधून अन्नधान्य वितरण करताना तांत्रिक अडचणी येत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले होते. सदर तांत्रिक समस्येमुळे अन्नधान्य वितरण ऑफलाईन देण्याची विनंती शासनाच्या वतीने क्षेत्रीय कार्यालयांना करण्यात आली आहे.

अपवादात्मक परिस्थितीमध्ये ऑफलाईन धान्यवाटप करण्याकरिता स्वस्त धान्य दुकाननिहाय लॉगिन तयार करण्याच्या सूचना सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या असून ज्या स्वस्त धान्य दुकानाचे लॉगिन पोर्टलवर तयार करण्यात आले नसतील अशा स्वस्त धान्य दुकानाचे लॉगिन तात्काळ तयार करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

राज्यातील सर्व्हरशी संबंधित तांत्रिक अडचणीचे निराकरण होई पर्यंत एक विशेष बाब म्हणून ऑफलाइन धान्य वितरणास परवानगी देण्यात आली आहे. ऑफलाईन धान्य वितरण करताना शासकीय अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थितीत ते वितरण करण्यात यावे, त्याच्या नोंदी प्रमाणित करून वाटप करण्यात आलेल्या अन्नधान्याचा तपशील शासनास सादर करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...