spot_img
ब्रेकिंग..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

..तर पाडापाडीचा निर्णय घ्यावाच लागणार; जरांगे पाटलांचा सरकारला पुन्हा इशारा

spot_img

Manoj Jarange Patil News: जर सरकार आपल्यावर अन्याय करणार असेल, चारही बाजूंनी मराठ्यांना घेरण्याचा प्रयत्न करत असेल आणि हक्काचं आरक्षण देण्यास टाळाटाळ करत असेल, तर आम्हाला पाडापाडीचा निर्णय घ्यावा लागणार आहे, असे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यामध्ये माध्यमांशी संवाद साधला. तसेच २९ तारखेला या मुद्द्यावर निर्णय होणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. पुढे बोलतांना जरांगे पाटील म्हणाले, “गर्वाला कधी वाढ नसते, कधी ना कधी संपतोच. लोकसभेला जे झालं त्यापेक्षा विधानसभेत ५ पटीने होईल. मराठ्यांनी दिलेल्या सत्तेचा गर्व सरकारला आला आहे. मराठा कुणबी एकच आहे,

मराठ्यांवर जाणूनबुजून अन्याय केला जात आहे. सारथीच्या कोणत्या सवलती आम्हाला कामी येतात? सगळ्या मुलींना मोफत शिक्षण दिलं जातं, मग फी का घेतली जाते? मी पावत्या देतो. अर्धवट गुंतवणूक ठेवली जाते. प्रवेशासाठी पैसे घेतले जातात. त्यामुळे सरकारवर सर्व समाजातील लोक नाराज झाले आहेत,” असं त्यांनी सांगितलं.शरद पवार यांच्या मतांचा विचार करण्यापेक्षा, माझं मन, माझे विचार काय सांगत आहेत, हे माझ्यासाठी महत्त्वाचं आहे.

मराठ्यांचे कल्याण व्हावं, तसंच लिंगायत, धनगर, मुस्लीम समाजालाही आरक्षण मिळायला हवं, ही प्रामाणिक भावना आहे. बारा बलुतेदारांची वेगळ्या प्रवर्गाची मागणी आहे. आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत. परिणाम काहीही झाले, सर्व जातीधर्माला आरक्षण दिलं पाहिजे. वेळ पडली तर सर्वांना एकत्र येत विधानसभेत जाण्याची तयारी ठेवली पाहिजे, असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, लोकांचा आक्रोश आणि संतापाची लाट कशासाठी आहे, इतका जोर का धरला जात आहे, हे समजून घेणं गरजेचं आहे.मराठ्यांच्या आरक्षणावर समाधानकारक तोडगा कसा काढायचा, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण दिल्याशिवाय पर्याय नाही, हे सरकारला कळायला हवं. उगाच डिवचण्याचा प्रयत्न केला तर परिणाम वेगळ्या दिशेला जातील. विधानसभेचं दार आतून बंद केलं आहे, ते उघडावं लागेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...