नवी दिल्ली | वृत्तसंस्था
गेल्या वर्षी पॅसिफिक महासागरात ‘एल निनो’ची परिस्थिती निर्माण झाली होती. यामुळे त्याचा मॉन्सूनवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी पावसाचे प्रमाण कमी राहिले होते. तसेच हिंवाळ्यातही उबदार वातावरण राहिले. पण आता जगभरातील अनेक हवामान संस्थांनी येत्या मान्सून कालावधीत ‘ला निना’ परत येण्याचा अंदाज वर्तवला आहे.
आशिया-पॅसिफिक इकॉनॉमिक कोऑपरेशन लायमेट सेंटरने या वर्षातील भारतातील पहिल्या मान्सूनचा अंदाज वर्तवला आहे. केंद्राने एप्रिल ते जून आणि जुलै ते सप्टेंबर या कालावधीसाठी दोन स्वतंत्र हवामान अंदाज जारी केले आहेत.
या अंदाजानुसार, देशातील मान्सून हंगामातील जुलै ते सप्टेंबर दरम्यानच्या कालावधीत सामान्यपेक्षा जास्त पावसाची शयता आहे. या अंदाज बदलाचे श्रेय अलीकडील ईएनएसओ अलर्टला दिले जाते; जे एल निनो ते ला निना स्थितीत अंदाज व्यक्त करते.
जुलै ते सप्टेंबर या कालावधीत देशात सामान्यपेक्षा जास्त पावसाची शयता आहे. जुलै ते सप्टेंबरच्या अंदाजात, एपीसीसी लायमेट सेंटरने म्हटले आहे की, पूर्व आफ्रिका ते अरबी समुद्र, भारत, बंगालचा उपसागर आणि इंडोनेशिया, कॅरिबियन समुद्र, उष्णकटिबंधीय उत्तर अटलांटिक, दक्षिण ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण दक्षिण पॅसिफिक प्रदेशापर्यंत सामान्यपेक्षा अधिक पावसाची अधिक शयता वर्तवण्यात आली आहे. पूर्व आशिया आणि उत्तर ऑस्ट्रेलियाच्या काही प्रदेशांमध्ये सामान्यपेक्षा अधिक पर्जन्यवृष्टी अपेक्षित आहे.
जुलै-सप्टेंबर अंदाज
अनेक जागतिक हवामान संस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ला निना परिस्थिती जूनमध्ये पहिल्यांदा दिसू शकते. पण ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये ती ठळकपणे दिसून येईल.
एल निनो निघून गेला
एल निनो निघून गेला आहे आणि थंड टप्पा येत आहे. त्यामुळे चांगल्या मान्सून पावसाची शयता अधिक आहे. मे महिन्यापर्यंत याबाबत चित्र समोर येईल, असे केंद्रीय पृथ्वी विज्ञान मंत्रालयाचे माजी सचिव एम. राजीवन यांनी म्हटले आहे. याबाबतचे वृत्त डेक्कन हेराल्डने दिले आहे.