spot_img
अहमदनगरAhmednagar Crime: 'व्हॉट्सअ‍ॅप' वर तरुणाला फिरवले गोल? एका क्लिकवर एक लाख ८०...

Ahmednagar Crime: ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर तरुणाला फिरवले गोल? एका क्लिकवर एक लाख ८० हजारांचा झोल..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री-
इंटरनेटच्या जमान्यात सायबर क्राईम मध्ये वाढ होत चालली आहे. त्यातच आता शहरामधून एक बातमी समोर आली आहे. ‘व्हॉट्सअ‍ॅप’ वर आलेल्या कस्टमर सपोर्ट एपीके फाईलवर क्लिक केल्यानंतर एक लाख ८० हजार ४१३ रुपये डेबिट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक माहिती अशी: फिर्यादी वेगवेगळ्या बँकांचे क्रेडिट कार्ड वापरतात. ते १० जून रोजी दुपारी साडेबाराच्या सुमारास घरी असताना मोबाईलवरील व्हॉट्सअ‍ॅपवर अनोळखी व्हॉट्सअॅप नंबरवरून कस्टमर सपोर्ट एपीके फाईल आली. त्यांनी ती फाईल पाहण्यासाठी त्यावर क्लिक केले.

क्लिक करताच त्यांच्या मोबाईलवर ओटीपी आले. त्यानंतर त्यांच्या एस बँकेच्या क्रेडिट कार्डवरून तीन हजार दोन रुपये डेबिट झाले. त्यानंतर त्यांच्या एचडीएफसी, एवं, आयसीआयसीआय, एसबीआय अशा बैंक खात्याच्या क्रेडिट कार्डमधून टप्प्याटप्याने एकूण एक लाख ८० हजार ४१३ रूपये डेबिट झाल्याचे मेसेज आले. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पोलीस ठाणे गाठत फिर्याद दिली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...