संगमनेर । नगर सहयाद्री:-
शेततळ्यात बुडून आजोबा आणि नातवाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि.२५) सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास तालुक्यातील वेल्हाळे गावातील पिंपळ मळा येथे घडली. शिवाजी आत्याबा सोनवणे (वय ६६), समर्थ नितीन सोनवणे (वय ३) (दोघेही रा. पिंपळ मळा, वेल्हाळे, ता. संगमनेर) अशी मृत आजोबा आणि नातू यांची नावे आहेत.
शिवाजी सोनवणे हे शेतात काम – करत होते. त्यांचा तीन वर्षांचा नातू समर्थ हा त्यांना बोलवण्यासाठी गेला होता. खेळता खेळता समर्थ हा समर्थ सोनवणे
शेततळ्यात पडला. नंतर शिवाजी सोनवणे यांनी शेततळ्यात उडी घेतली. मात्र ते नातवाला वाचवू शकले नाही. शेततळ्यात बुडून दोघांचाही मृत्यू झाला.
घटनेची माहिती समजतात सोनवणे यांचा मुलगा नितीन सोनवणे यांनी आसपासच्या नागरिकांना आवाज देत गोळा केले. ग्रामस्थांच्या मदतीने दोघांनाही शेतकऱ्यातून बाहेर काढत उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तत्पूर्वीच आजोबा आणि नातवाचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.
याप्रकरणी संगमनेर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.