spot_img
अहमदनगरUnseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी, पारनेरमध्ये झाले ‘इतके’ नुकसान

Unseasonal Rain : अवकाळी पावसाने शेतकर्‍यांच्या डोळ्यात पाणी, पारनेरमध्ये झाले ‘इतके’ नुकसान

spot_img

२४ गावातील १२ हजार १०० शेतकरी उध्वस्त | सर्वपक्षीय पदाधिकारी, अधिकारी शेतकर्‍यांच्या बांधावर
Unseasonal Rain : पारनेर | नगर सह्याद्री – रविवारी सायंकाळी पारनेर तालुयातील अनेक भागात झालेल्या गारपीटीने २४ गावे, १२ हजार शेतकरी, ७ हजार ४४९ हेटर क्षेत्रावरील कांदा, ज्वारी, द्राक्ष, अपल बोरं, डाळींब, पपईचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सोमवारी सकाळीच आमदार नीलेश लंके यांच्यासह भाजप, शिवसेना पदाधिकारी, अधिकारी यांनी शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली.

आमदार लंके सकाळी पानोली येथे पोहोचले. ८५ वर्षाची आजी कौसाबाई धोंडीबा पवार म्हणाल्या टोमॅटोला पैसे मिळतील म्हणून लावले आणि सगळेच गेले. वडुलेचे किसन पवार, उत्तम पठारे यांची ज्वारी, सुदाम कारभारी रासकर यांची एक एकर केळी, कांदा, सांगवी सूर्यातील २५० हेटर वरील कांदा पिकाच्या नुकसानची पाहणी आमदार लंके यांनी केली. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना नुकसानीचे व्हिडिओ पाठवले. यावेळी बापू भापकर, शिवाजी शिंदे, संदीप गाडेकर, शिवाजी शिंदे, प्रवीण थोरात, मोहन आढाव, नारायण साठे त्यांच्यासोबत होते.

निघोज मंडलातील प्राथमिक माहिती
या भागात केळी, कांदा, ज्वारी, द्राक्षे, डाळिंब, मका, बोर, पपई, टोमॅटो, सीताफळ याचे मोठे नुकसान झाले. येथील प्राथमिक अंदाज असा (गावासमोर कंसात क्षेत्र, शेतकरी संख्या) करंदी (२५१-६२९), सिद्धेश्वर वाडी (२४०-५९८), पानोली (४७२-८७०), हत्तलखिंडी (१२०-७५०), गांजीभोयरे (२४९-३६८), पिंपळनेर (५०२-४१५), वडुले (१९३-५०२), सांगवी सूर्या (४०२-७८३), माझमपूर (२०-२९१), चिंचोली (२३१-५६०), जवळा (६१२-१२५१), निघोज (१९२६-१४५३), पठारवाडी (५०६-५२३), गाडीलगांव (१७४-२९८), पिंपरी जलसेन (४८५-४८३), गुणोरे (३१८-४२९), देवीभोयरे (४९२-६२३), म्हसे खुर्द (८४-३८३), वडनेर हवेली (९६-२५१), गटेवाडी (३६-८३), घाणेगाव (२५-८०), हंगा (४-१२).

भाजपा पदाधिकार्‍यांकडून पाहणी
भाजपचे तालुकाध्यक्ष राहुल शिंदे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, कैलास शेळके यांनीही तालुक्यात ठिकठिकाणी पाहणी केली. महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. प्राथमिक अहवाल तयार करण्यात आला असल्याचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य विश्वनाथ कोरडे, तालुकाध्यक्ष राहुल शिंदे यांनी सांगितले. महसूल मंत्री विखे पाटील यांच्या आदेशानंतर प्रांताधिकारी गणेश राठोड यांनी जवळा, सांगवी सूर्या, सिद्धेश्वर वाडी, गांजीभोयरे आदी ठिकाणी पाहणी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...