उदय गुलाबराव शेळके फाउंडेशनच्या बोधचिन्हाचे अनावरण
मुंबई | नगर सह्याद्री:
जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके यांचे राज्यातील बँकिंग चळवळीसाठी मोठे योगदान आहे. हीच परंपरा सुरू राहण्यासाठी उदय गुलाबराव शेळके फौंउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा गीतांजली शेळके यांना पाठबळ देण्याची खर्या अर्थाने गरज आहे. जनसामान्यांच्या विश्वासाच्या जोरावर शेळके कुटुंब नावलौकिकास पात्र असल्याचे गौरवोद्गार माजी केंद्रीय मंत्री जेष्ठ नेते खा. शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.
मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वाय बी चव्हाण सभागृहात झालेल्या उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या बोधचिन्ह अनावरण व उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झाले. याप्रसंगी आयोजित कार्यक्रमावेळी पवार बोलत होते. यावेळी कॉग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात, माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ, पद्मश्री पोपटराव पवार, मुंबई बँकेचे माजी उपाध्यक्ष विठ्ठलराव भोसले, रयतचे उपाध्यक्ष अरुण कडू पाटील, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अशोकराव धात्रक, माजी आमदार बापूसाहेब पठारे, फौंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तसेच जिल्हा सहकारी बँक, जी एस महानगर बँकेच्या संचालिका गीतांजली शेळके, जी एस महानगर बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद, सी.बा आडसुळ यांच्यासह तसेच आजी-माजी संचालक, पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्याने उपस्थित होते.
पवार म्हणाले, सॉलिसिटर होणे एवढी सोपी गोष्ट नाही. मात्र गेली पन्नास वर्षांपूर्वी मुंबईत येऊन रात्रीची शाळा आणि दिवसभराची नोकरी करीत गुलाबराव शेळके हे सॉलिसिटर झाले. ही मराठी माणसासाठी अभिमानाची बाब होती. तेवढ्यावर ते थांबले नाहीत. तर त्यांनी नगर-पुणे जिल्ह्यातील मुंबई स्थायिक लोकांना एकत्र करत जी एस महानगर बँकेची स्थापना करुण आज त्या बँकेचा नावलौकिक वाढविण्यासाठी शेळके पिता पुत्रांनी अविरत प्रयत्न करुण समाजासाठी मोठे योगदान दिले असल्याचे त्यांनी सांगितले. देशात नावलौकिक प्राप्त झालेल्या बँकेचे अध्यक्ष सॉलिसिटर शेळके हे होते.
म्हणजे राज्यातील सहकाराची मुहूर्तमेढ रोवणार्यांच्या पंक्तीत जाऊन बसण्याची संधी शेळके यांना मिळाली. भल्या भल्यांना शिस्तीचे धडे देत उदय यांनी जिल्हा बँकेचा कारभार अतिशय कार्यक्षमपणे संभाळला, असल्याचे ते म्हणाले. उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या माध्यमातून गीतांजली शेळके या सामाजिक काम मोठ्या प्रमाणात करत आहे. त्यांनी एक आदर्श उभा केला आहे. त्यासाठी आवश्यक ते पाठबळ आपण देणार असल्याची ग्वाही पवार यांनी दिली आहे.
यावेळी माजी मंत्री थोरात म्हणाले, गीतांजली शेळके यांच्या नेत्वृत्वाचे कौतुक केले. संकटाची मालिका सुरू झाल्यानंतर काही दिवस दुखात गेले. मात्र हे दुख बाजूला ठेऊन जी एस महानगर बँकेचे संस्थापक अध्यक्ष सॉलिसिटर गुलाबराव शेळके व माजी अध्यक्ष उदय शेळके यांनी उभे केलेले कर्तृत्वाचे साम्राज्य सर्वसामान्य जनतेसाठी आधारवड आहे. हे समजून गीतांजली शेळके यांनी आपले काम सामाजिक भावनेतून सुरु ठेवले. असल्याचे त्यांनी सांगितले.
पद्मश्री पोपटराव पवार यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. जी एस महानगर परिवार यांना सामाजिक काम करण्याची मोठी संधी असून या संधीचे सोने होणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री आनंदराव अडसूळ, माजी आमदार सुधीर तांबे, माजी आमदार अशोकराव धात्रक, माजी आमदार बापूसाहेब पठारे मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उत्तम घोलप यांनी केले. आभार बँकेचे उपाध्यक्ष भास्करराव कवाद यांनी मानले.
पारनेर ही रत्नांची भूमी
पारनेर तालुका हा सातत्याने दुष्काळी तालुका असला तरी हा तालुका म्हणजे गुणवंत रत्नांची भुमी आहे. सॉलिसिटर गुलाबराव शेळके, उदय शेळके यांनी कर्तृत्ववान इतिहास निर्माण केला. तशाप्रकारे खासदार नीलेश लंके या तरुणाने खासदार होऊन मोठ्या माणसाला चपराक दिलीच. परंतु संसद सदस्य म्हणून शपथ घेताना हम भी कुछ कम नहीं हे दाखवून तर दिलेच परंतु शेतकर्यांचे प्रश्न संसदेच्या सभागृहात मांडताना पहिलेच दहा मिनिटे भाषन मराठीत करुण देशाचे लक्ष वेधून घेतले असल्याचे जेष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले.
लोकाभिमुख विकासासाठी मोठे योगदान
सॉलिसिटर गुलाबराव शेळके साहेब यांचे कर्तृत्व मोठे होते. त्यासाठी उदय दादा शेळके यांनी मोठी साथ देऊन जी एस महानगर बँकेचा वटवृक्ष वाढवीला आहे. सामाजिक, शैक्षणिक, सहकार क्षेत्रात काम करताना त्यांनी लोकाभिमुख विकासासाठी मोठ्या प्रमाणात योगदान दिले आहे. मुलगी प्रियंका व आभा या शैक्षणिक क्षेत्रात हुशार आहेत. त्यांना हे बाळकडू शेळके साहेब व दादा यांच्याकडून मिळाले आहे. आपण हीच त्यांची सामाजिक परंपरा जतन करण्यासाठी या उदय गुलाबराव शेळके फौउंडेशनच्या माध्यमातून प्रयत्नशील राहू, अशी ग्वाही संचालिका गीतांजली शेळके यांनी यावेळी दिली.