दक्षिण आफ्रिका दौर्यात फक्त कसोटीसाठी उपलब्ध
Virat Kohli News : नवी दिल्ली | वृत्तसंस्था – रन मशीन असलेल्या विराट कोहलीने [Virat Kohli News] दक्षिण आफ्रिका दौर्यावर टी-२० आणि एकदिवसीय सामने खेळण्यास नकार दिला आहे. त्याने बीसीसीआयला आपल्या निर्णयाची माहिती दिल्याचे वृत्त आहे. कोहली पांढर्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांती घेईल आणि फक्त कसोटी क्रिकेटसाठी उपस्थित असेल, असे सांगण्यात येते.
विराट कोहलीने बीसीसीआयला पांढर्या चेंडूच्या क्रिकेटमधून ब्रेक घेणार असल्याची माहिती दिली आहे. तो केवळ कसोटी क्रिकेटमध्ये उपलब्ध असेल. भारतीय संघाचे पुढील मिशन दक्षिण आफ्रिका दौरा आहे. तेथे तिन्ही फॉरमॅटची मालिका खेळणार आहे. या दौर्याची सुरुवात १० डिसेंबरपासून तीन सामन्यांच्या टी-२० मालिकेने होणार आहे. त्यानंतर १७ डिसेंबरपासून ३ सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाईल आणि त्यानंतर २६ डिसेंबरपासून टीम इंडिया दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
कोहलीने बीसीसीआय आणि निवडकर्त्यांना सांगितले, की त्याला पांढर्या चेंडूच्या क्रिकेटमधून विश्रांतीची गरज आहे. जेव्हा त्याला पांढर्या चेंडूचे क्रिकेट खेळावे वाटेल तेव्हा तो परत येईल. सध्या तो लाल बॉल क्रिकेट खेळणार आहे, म्हणजेच तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी उपस्थित राहणार आहे.