अहमदनगर । नगर सहयाद्री
जिल्ह्यातील १४९ ग्रामपंचायत निवडणुकीसाठी आज मतदान होत आहे. मतदानासाठी एकूण ७३२ मतदान केंद्रे आहेत. आज सकाळपासून मतदानाला सुरवात झाली असून सायंकाळपर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडेल. उद्या सोमवार, दि.६ रोजी मत मोजणी होऊन निकालाची घोषणा होणार आहे.
६१० उमेदवार रिंगणात
१४९ ग्रामपंचायतीमधील सदस्य पदाच्या १ हजार ७०१ जागांसाठी ७ हजार २६० उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
माघारीनंतर ३ हजार ९९५ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे.
सरपंच पदाच्या १९४ जागांसाठी १ हजार ३११ उमेदवारी अर्ज दाखल झाले होते.
माघारीनंतर ६१० उमेदवार रिंगणात आहे.
ईतक्या ग्रामपंचायतींसाठी मतदान
श्रीरामपूर १३ ग्रामपंचायत, राहता १२ ग्रामपंचायत, राहुरी २१ ग्रामपंचायत,नेवासे १६ ग्रामपंचायत, नगर ६ ग्रामपंचायत, पारनेर ७ ग्रामपंचायत, अकोले २२ ग्रामपंचायत, संगमनेर ६ ग्रामपंचायत, कोपरगाव १७ ग्रामपंचायत, पाथर्डी १४ ग्रामपंचायत, शेवगाव २७ ग्रामपंचायत, कर्जत ६ ग्रामपंचायत, जामखेड ३ ग्रामपंचायत, श्रीगोंदाच्या ९ ग्रामपंचायतींचा समावेश आहे.