नगर सह्याद्री : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या एका विधानाने नागरिकत्व सुधारणा विधेयक (CAA) पुन्हा चर्चेत आले आहे. आम्ही नागरिकत्व सुधारणा विधेयक आणणारच असं मोठं वक्तव्य त्यांनी केलं आहे.
बुधवारी पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका रॅलीला संबोधित करताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सीएए संदर्भात मोठे विधान केले. आम्ही बंगालमध्ये सीएए आणणारच. हा देशाचा कायदा असून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे अमित शाह यांनी म्हटले आहे.
काय आहे हा कायदा?
या कायद्यामुळे पाकिस्तान, बांगलादेश आणि अफगाणिस्तान या तीन देशांमधील अल्पसंख्यांकांना भारतीय नागरिकत्व देण्याची तरतूद आहे. धार्मिक छळामुळे ज्या अल्पसंख्याकांना या देशातून पळ काढावा लागला आहे,
त्यांना या कायद्यामुळे भारतात नागरिकत्व मिळेल, असं भाजप सरकारनं म्हटलं आहे. मात्र विरोधकांनी या कायद्यावर प्रचंड टीका केली आहे. हा कायदा म्हणजे मुस्लिमांना मुख्य प्रवाहातून बाजूला सारण्याचा प्रयत्न आहे, अशी टीका विरोधी पक्षांनी केली आहे.
बंगालमध्ये २०२६ मध्ये भाजपचे सरकार स्थापन होणार
अमित शहा म्हणाले की, 2026 च्या निवडणुकीत भाजप बंगालमध्ये दोन तृतीयांश बहुमताने सरकार स्थापन करेल. पण २०२४ च्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत.
2019 मध्ये तुम्ही 18 जागा जिंकून भाजपला दिल्या होत्या. पण मी तुम्हाला विनंती करण्यासाठी आलो आहे की, मला २०२४ मध्ये इतक्या जागा द्या की शपथ घेतल्यानंतर मोदींना म्हणावे लागेल की, मी बंगालमुळे पंतप्रधान झालो आहे.