spot_img
अहमदनगरहॉटेलमध्ये घडलं ते भयंकर! दोघांनी चित्रिकरण करुन 'तसला' व्हिडीओ केला व्हायरल

हॉटेलमध्ये घडलं ते भयंकर! दोघांनी चित्रिकरण करुन ‘तसला’ व्हिडीओ केला व्हायरल

spot_img

Crime News: माथेरानमधील एका हॉटेलमध्ये १४ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि त्याचे चित्रिकरण करून व्हिडीओ व्हायरल करण्याची अत्यंत गंभीर घटना समोर आली आहे. या घटनेत प्रमुख आरोपी आणि चित्रिकरण करणारी सहकारी अद्याप फरार आहेत, तर पोलिसांनी २२ वर्षीय युवकाला अटक केली आहे. १२ जुलै रोजी आपल्या तीन मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला गेलेल्या या अल्पवयीन मुलीवर एका मुलाने अत्याचार केला.

घटनेचे चित्रिकरण करणाऱ्या उर्वरित दोघांनी तो व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. या दोन आरोपींपैकी एकाला पोलिसांनी अटक केली आहे. मात्र, चित्रिकरण करणारी मैत्रिण आणि बलात्कार करणारा मुख्य आरोपी अद्याप फरार आहेत.आरोपींवर भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामध्ये बलात्कार, अपहरण, आणि लैंगिक अत्याचार यासह माहिती तंत्रज्ञान कायद्याचे कलम ६७ अ आणि ६७ ब अंतर्गतही गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

पीडित मुलीने सांगितले की, ती आपल्या मैत्रिणीसोबत वाढदिवस साजरा करण्यासाठी बाहेर गेली होती. माथेरानमधील हॉटेलमध्ये तिच्यावर बलात्कार झाला. घटनेचे चित्रिकरण करणाऱ्या तिच्या मैत्रिणीने व्हिडीओ सोशल मीडियावर प्रसारित केला. १४ जुलै रोजी हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर पीडित मुलीच्या नातेवाईकांनी तिच्या पालकांना माहिती दिली. घाबरल्यामुळे मुलीने आधी काहीही सांगितले नव्हते, परंतु नंतर पालकांच्या विचारणेनंतर प्रकरण उकडकीस आले. पीडित मुलीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्वरित कारवाई करत १९ जुलै रोजी एकाला अटक केली आहे. मुख्य आरोपी आणि चित्रिकरण करणाऱ्या सहकार्याचा शोध सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...