spot_img
अहमदनगरघराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

घराणेशाहीला मतदान करणं बंद केलं तर?

spot_img

राजाच्या विरोधात विचार मांडले तरी ते राजाने सहन करावे अन् त्यावर चिंतन करावे! तीच खरी लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा

मोरया रे / शिवाजी शिर्के –
राऊळबुवा देवस्थानच्या जमिनीबद्दल बोलणारा बाप्पा कर्मचार्‍यांच्या पगार कपातीबद्दलही बोलून गेला होता. आजच्या भेटीत या सार्‍याबद्दल त्याला जाब विचारण्याचं ठरवूनच मी कार्यालय गाठलं. पार्कींगच्या पोर्चमध्ये बाप्पा समोरच दिसला!

मी- बाप्पा, चल कार्यालयात बसून बोलू!

श्रीगणेशा- मी ‘बसत’ नाही रे!

मी- बाप्पाचा मुड चेष्टेचा असल्याचं मी ताडलं! बाप्पा, सकाळी- सकाळी बसण्याच्या गोष्टी! बसू म्हणजे इथं व्हरांड्यात बोलण्यापेक्षा कार्यालयात बसून बोलू असं रे! तुुुझ्या मनात कायमच असं वेडवाकडं! बसणार्‍यांपैकी मी नाही बरं! उपहासात्मक, टिकात्मक टोपणे नको सुरू करु सकाळीच!

श्रीगणेशा- अरे बाबा, खरं तर प्रखर टीका सहन करण्याचा सल्ला कालच तुमचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलाय! विश्वगुरु व्हायचं, तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असा सल्ला द्यायला ते विसरले नाहीत!

मी- बाप्पा, थेट गडकरीसाहेबांकडे गेलास तू! इथे आपल्या जिल्ह्यात अशा विचारसरणीचे अनेकजण आहेत. विरोधातील प्रखर टिका सहन करणारे अनेकजण आहेत इथे नगरमध्ये! धर्मनिरपेक्षतेची भावना तर अनेकांकडे ठासून भरलीय!

श्रीगणेशा- नागपुर मुक्कामी गडकरी काय म्हणाले ते आधी समजून घे रे! लोकशाहीत सर्वोच्च पदावरच्याने प्रखर टीका सहन करावी असं त्यांनी म्हटलंय. राजाविरूद्ध कितीही बोललं तरी ते राजाने सहन करावं. राजाने प्रखर टीकेवर चिंतन करावं, टीका सहन करणं ही राजाची सर्वात मोठी परीक्षा असते. विश्वगुरु व्हायचे तर शिवरायांसारखे धर्मनिरपेक्ष व्हा असा सल्ला देतानाच साहित्यिक, विचारवंतांनीही परखडपणे विचार मांडावे असंही गडकरी म्हणाले.

मी- बाप्पा, अगदी रास्त भूमिका मांडलीय त्यांनी!

श्रीगणेशा- गडकरींसारखा स्पष्टवक्तेपणा सार्‍यांमध्येच हवा रे! खरं तर आपल्या लोकशाहीमध्ये साहित्यिकांसह विचारवंतांनी त्यांचे विचार परखडपणे मांडले पाहिजेत! राजाच्या विरोधात कोणीही परखडपणे विचार मांडले तरी ते राजाने सहन केले पाहिजे आणि त्या विचारावर चिंतन केले पाहिजे हीच खरी लोकशाहीची सर्वात मोठी परीक्षा असते! काय चुकलं आणि काय बरोबर हे सांगणारा देखील हवाच रे! आणि समजून घेणारा देखील हवाच ना! विरोधात भूमिका मांडली म्हणजे तो लागलीच विरोधक ठरवला जात असेल तर तेही चुकीचेच ना! खरं तर गडकरींच्या भूमिकेचं कौतुकच केेलं पाहिजे! आपलं राज्य ही संतांची भूमी आहे. शिवाजी महाराजांची भूमी आहे. प्रत्येक व्यक्तीकडून जे चांगलं आहे ते आपण घेतलं पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासामध्ये सगळ्यात मोठी गोष्ट होती की, त्यांनी अनेक वेळा विजय मिळवल्यानंतर कधीही परधर्मीयांची पूजा, मंदिर उद्ध्वस्त केली नाहीत. विरोधी असणार्‍या स्त्रियांचा सन्मान केला त्यांना घरी पाठवलं. एका अर्थाने त्यांनी आदर्श राजाचा परिचय करून दिला. सर्वधर्मसमभावाच सगळ्यात चांगलं उदाहरण कुठल असेल छत्रपती शिवाजी महाराज! त्या आपल्या राजाचा आदर्श आपण घेणार आहोत की नाही! आज आपल्याकडे घराणेशाहीचं राजकारण सुरू आहे. खरं तर काल- परवापर्यंत घराणेशाहीच्या विरोधात मत मागणारी मंडळी आज त्याच वाटेने जाताना दिसत आहेत. घराणेशाहीतून स्वत:ला आणि आता बायको- पोरांसाठी मतं मागितली जात असतील तर ही घराणेशाही चालू ठेवायची का याचाही विचार व्हायलाच हवा! घराणेशाहीतून येणार्‍यांना मतदान करणं बंद केलं तर एका मिनिटात ही सारी मंडळी सरळ होतील. राजकारणात माझ्या मुलाचे कल्याण करा किंवा बायकोला तिकीट द्या असा आग्रह काही राजकारणी धरतात. जनता अशा लोकांना मत देते व त्यामुळेच ही मंडळी मानगुटीवर बसतात! त्यांना विरोधात बोललेलं, मत मांडलेले सहन होत नाही. ज्या दिवशी जनता ठरवेल की वारसा हक्काने आलेल्यांना मतदान करणार नाही, तेव्हा ते लोक एका मिनिटात सरळ होतील. कुणाचा मुलगा- मुलगी असणे किंवा पत्नी असणे म्हणजे पुण्य किंवा पाप नाही. मात्र त्याने स्वत:ची क्षमता सिद्ध केलीच पाहिजे!

मी- बाप्पा, पण तुझे हे विचार आज अनेकांना पटणार नाहीत! तू म्हणतो तसं झालं तर मग सतरंज्या कोण उचलणार? परवा इंदोरीकर महाराज म्हणाले, आजच्या नव्या पिढीतीन पन्नास टक्के तरुण हे याच नेत्यांच्या सतरंज्या उचलू-उचलू वाया गेलेेत! त्या तरुणांच्या हाताला काम द्यायचं सोडून त्यांची डोकी भडकून देण्यात धन्यता मानली जात आहे.

श्रीगणेशा- काय चुकीचं बोललेत ते इंदोरीकर महाराज! वास्तववादी भूमिका मांडायचीच नाही आणि कोणी मांडलीच तर त्याला लागलीच विद्रोही, सुपारीबाज ठरवायचा प्रघात अलिकडे सुरू झालाय आणि तो अत्यंत घातक आहे. याच परिस्थितीत नितीन गडकरींसारखा नेता स्पष्ट बोलतो आणि भूमिका मांडतो ही बाब नक्कीच कौतुकास्पद आहे. तझ्या जिल्ह्यातील विषय सोडून जरा गडकरींची भूमिका आवडली म्हणून त्यावर भाष्य केलं रे! बोलणार आहेच नगरच्या प्राप्त राजकीय आणि सामाजिक परिस्थितीवर! पण, पुढच्या भेटीत! (दुसर्‍या क्षणाला बाप्पाने निरोप घेतला आणि मी देखील कार्यालयाच्या पायर्‍या चढू लागलो.)

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...