Manoj Jarange Patil: राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा प्रश्न चांगलाच तापला आहे, तर दुसरीकडे विधानसभेसाठी राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सोलापूरच्या दौऱ्यावर असताना “कशाला हवंय आरक्षण?” या वक्तव्यामुळे वाद निर्माण झाला आहे. मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंनी प्रत्यूत्तर देत म्हटले की, “त्यांना आरक्षण नकोय, पण बाकीच्यांना हवंय.”
मनोज जरांगेंनी असा प्रश्न उपस्थित केला की, “राज ठाकरेंच्या गाडीवर सुपारी फेकणारी मंडळी कोण होती हे मी पाहिलं नाही, पण राज्यात कुठेही आंदोलन सुरु नाही. फडणवीसांसारखे सुपारी घेतल्यासारखं आंदोलन करणं आणि यात्रा काढणं बंद करा. आम्ही मुंबईला जाऊन जाब विचारू शकतो. समाजात ताकद आहे.” “गाड्या फोडणाऱ्यांच्या विचारांना थोडंच राज्य चालतं. दंगली होणार नाहीत. आम्हाला कोणीही कोणत्या पक्षाचा आहे असं म्हटलं जातं, पण मराठा समाजाकडून राज्यात कोणताही आंदोलन सुरू नाही.”
पुढे बोलतांना जरांगे म्हणाले, “राज ठाकरेंना आरक्षणाची गरज नाही, बाकीच्यांना आहे. गोरगरिबांना आरक्षणाची आवश्यकता आहे. जे त्यांना वैभव मिळालं ते मराठ्यांच्या जीवावर मिळाले. एसीत बसणाऱ्यांना आरक्षणाची झळ कळणार नाही. गोरगरिबांच्या भावना जाणून घ्या. प्रत्येक वेळी तुमचेच विचार जनतेवर लादून चालत नाही. असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.