spot_img
अहमदनगरका झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले 'कारण'

का झाला शिर्डीत पराभव? माजी खा. लोखंडे यांनी स्पष्टच सांगितले ‘कारण’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
अयोध्येत बांधण्यात आलेल्या श्रीराम मंदिरांचा भाजपला राजकीय फायदा होणार असे गणित मांडले जात होते. विरोधकांकडून यासंबंधी आरोपही केले जात होते. मात्र, शिर्डीतील महायुतीचे पराभूत उमेदवार, माजी खासदार सदाशिव लोखंडे यांनी वेगळेच विश्लेषण केले आहे. लोखंडे यांनी म्हटले आहे की, अयोध्यामध्ये बांधण्यात आलेले राम मंदिर हेही एक माझ्या पराभवाचे कारण आहे. कारण शिर्डी लोकसभा मतदारसंघात रावणाला मानणारा आदिवासी समाज मोठ्या संख्येने आहे. त्यांना राम मंदिर रुचले नाही, असे लोखंडे यांनी कर्जत येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले. लोखंडे यांच्या या विधानावरून आता नव्या चर्चेला तोंड फुटणार आहे.

दरम्यान माजी खासदार लोखंडे यांनी महायुतीकडून शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडून लोकसभा निवडणूक लढविली होती. या निवडणुकीत महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरेयांनी त्यांचा पराभव केला. लोखंडे मूळचे जामखेड तालुयातील आहेत. पूर्वी ते कर्जत-जामखेडमधून आमदार होते. त्यामुळे अलीकडेच त्यांनी कर्जतला भेट दिली. त्यावेळी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी हे वक्तव्य केले.

शिर्डीत आपला पराभव का झाला? काय कारणे असावीत? असा प्रश्न पत्रकारांनी त्यांनी विचारला. त्याला उत्तर देताना लोखंडे म्हणाले, शिर्डी मतदारसंघात आदिवासी पट्टा आहे. तेथे रावणाला मानणारे बरेच आदिवासी आहेत. त्यांना राममंदिर रुचलेले दिसत नाही. त्याचा फटका मतदानाला बसला. याशिवाय त्या मतदारासंघात राजकीय गटतट मोठे आहेत. कारखानदारांच्या साम्राज्यांचे गटतट आहेत. त्यांच्यात कमालीचा संघर्ष आहे, त्यांच्या संर्घषात माझा बळी गेला, असे सांगून लोखंडे यांनी महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय संघर्षामुळेही आपला पराभव झाल्याकडे लक्ष वेधले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरकारच्या घोषणा ‘लाडक्या खुर्चीसाठी’; प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा सरकारवर हल्लाबोल | नगरमध्ये शिवस्वराज्य यात्रा अहमदनगर | नगर सह्याद्री:- सध्या राज्यात...

‘परतीच्या पावसामुळे बळीराजाच्या डोळ्यात पाणी’

अमदनगरमध्ये ९१६ हेक्टरवर नुकसान मुंबई | नगर सह्याद्री:- राज्यामुळे गेल्या काही दिवसांपासून पडणार्‍या परतीच्या पावासाने मोठं...

Ahmednagar Crime: एमआयडीसीत अवैध धंदा? दोन जणांवर गुन्हा दाखल

अहमदनगर | नगर सह्याद्री ग्राहक दक्षता कल्याण फाऊंडेशनच्या तक्रारीनंतर पुरवठा विभागाने नगर- मनमाड रस्त्यालगत एमआयडीसी...