मुंबई। नगर सहयाद्री:-
राज्यात सध्या मान्सून सक्रीय झाला असून सध्या पावसाचा जोर चांगलाच वाढला आहे. कोकण घाटमाथ्यावर जोरधारा सुरु असून मध्य महाराष्ट्रात पावसाने कहर झाल्यांचे चित्र आहे. मध्य महाराष्ट्रातील अनेक मंदिरे गोदावरीपात्रात बुडाली असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. दरम्यान, पुढील चार ते पाच दिवस कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिलाय.
दक्षिण गुजरातपासून केरळ किनार्याला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रीय असल्याने राज्यात पावसाचा जोर वाढला होता. सध्या मध्य प्रदेश, राजस्थानच्या लगत हा कमी दाबाचा पट्टा सरकल्याने येत्या काही दिवसात कोकण घाटमाथ्यासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात पावसाचा जोर ओरण्याची चिन्हे आहेत.
भारतीय हवाामान विभागाने वर्तवलेल्या हवामान अंदाजानुसार पुढील ५ दिवस पावसाचा जोर कमी राहणार असला तरी पुणे, सातारा जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला असून विदर्भातील काही जिल्हे आणि कोकणात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आलाय.
या जिल्ह्यांना कोणता अलर्ट?
पुणे आणि सातारा जिल्ह्याला हवामान विभागाने पावसाचा ऑरेंज अलर्ट दिला असून पालघर, ठाणे, मुंबई, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, कोल्हापूर जिल्ह्यांसह बुलडाणा, अहमदनगर, अकोला, अमरावती, वाशीम, यवतमाळ, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यांना तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा यलो अलर्ट आहे. उर्वरित राज्यात हलया सरींचा अंदाज दिला आहे.