spot_img
अहमदनगरकान्हूरपठार मधील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार : आमदार लंके, सरपंचांनी दिला...

कान्हूरपठार मधील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार : आमदार लंके, सरपंचांनी दिला ‘हा’ शब्द 

spot_img

कान्हूर पठार / नगर सह्याद्री
कान्हूरपठार मधील विकास कामांचा बॅकलॉग भरून काढणार असल्याचे आमदार निलेश लंके म्हणाले. कान्हूरपठार(ता.पारनेर) येथे पंचरत्न जय जवान जय किसान पँनल ची विजयी सभा व नवनिर्वाचित लोकनियुक्त सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांच्या सत्कार समारंभा प्रसंगी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले पारनेर तालुक्यात सर्वात जास्त निधी कान्हूरपठार गावामध्ये दिला आहे. 35 वर्षानंतर गावांमध्ये संत्तातर झाले आहे. लोकाभिमुख विकास कामे करून या संधीचे सोने करा असे आवाहन त्यांनी नवनिर्वाचित सरपंच व सदस्य यांना केले. त्यासांंठी लागेल तेव्हढा निधी देण्याचा शब्द आमदार लंके यांनी दिला आहे. कान्हूरपठार हे गाव तालुक्याला दिशा देणार गाव आहे म्हणून या गावांमध्ये एक कोटी रुपयांची अभ्यासिका उभी केली आहे. कान्हूरपठार भांंगाचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी कान्हूरपठार उपसासिंचन योजनेचा १८ किलोमीटरचा सर्व्हे झाला असल्याचेही त्यांनी सांगितले. ३८ कोटी रुपयांची मांडओहळ १६ गांव योजना लवकरच चालू होणार असल्याचे ही ते म्हणाले.
गावांतील चत्तर वस्तीवरील वैताळबाबा मंदिर, सकुबाई मंदिर, वरुंंडी माता मंदिर, पंगडबंद झापा वरील मारुती मंदिर, महिला बचत गट भवन, माजी सैनिक भवन, क्रिडा संकुलन या सर्व कामांसाठी निधी देणार असल्याचे ते म्हणाले. याप्रसंगी कोरठण खंडोबा देवस्थानचे विश्वस्त चंद्रभान ठुबे, राष्ट्रवादीचे जिल्हा सरचिटणीस अशोक घुले, विलास लोंढे महाराज, दादाभाऊ सोनावळे सर, लोकनियुक्त सरपंच संध्या ठुबे, जयश्री घावटे, बि. एल.ठुबे, शिवाजी व्यवहारे, किरण ठुबे, शिवाजी शेळके, गोवर्धन ठुबे, डी. सी व्यवहारे सर,  विजयानंद साळवे, भागा नवले,बाबासाहेब गुमटकर, सुभाष नवले,एस.पी ठुबे सर,बि. एम ठुबे सर, सहादू नवले, संजू सोनावळे, धनंजय ठुबे, सूरज नवले, रमेश सोनावळे, प्रा. भास्कर ठुबे, गणेश तांबे, गोकुळ ठुबे, गोकुळ व्यवहारे, हरी व्यवहारे, संपत ठुबे, सचिन गायखे, प्रमोद खामकर, तुषार सोनावळे, अमोल ठुबे, नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य प्रसाद नवले, श्रीकांत ठुबे, धनंजय व्यवहारे, सविता ठुबे, सुनीता गायखे, गंगुबाई तांबे, शुभांगी गुमटकर, सुनीता ठुबे, सुरेखा साळवे, छाया ठुबे, वंदना ठुबे, प्रियंका गायकवाड उपस्थितीत होत्या.

स्ट्रीट लाईट साठी ५० लाखांचा निधी
गावांतील स्ट्रीट लाईट साठी आमदार नितेश लंके
यांनी ५० लाखांचा निधी मंजूर केला आहे.

लोकसहभाग व आमदार निलेश लंके यांच्या
माध्यमातून कान्हूरपठारचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडवणार.
संध्या किरण ठुबे(लोकनियुक्त सरपंच ,कान्हूरपठार)

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र

मुळ राष्ट्रवादी कार्यकर्त्यांना दिलासा देण्यासाठी आम्ही एकत्र सुजित झावरे यांची पत्रकार परिषदेत माहिती शनिवारी अजित पवार...

केडगावमध्ये पुन्हा घडलं भयंकर! २७ वर्षांच्या तरुणावर सपासप वार? कारण आलं समोर..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- हात ऊसने दिलेल्या पैशाची मागणी करणार्‍या तरूणावर चाकूने हल्ला केल्याची...

दादांच्या आमदाराला साहेबांचा पाठिंबा? सब एक है! ‘वेळ आल्यावर..’;विद्यमान आमदारांच्या वक्तव्यामुळे चर्चांना उधाण..

Politics News: राज्यात निवडणुकीच बिगुल वाजलं आहे. आता पक्ष, नेते, उमेदवार निवडणुकीसाठी तयारीला लागले...

अहिल्यानगर ब्रेकिंग! अजय महाराज बारस्कर यांच्या कुटुंबावर जीवघेणा हल्ला? प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद, दोन तरुण ताब्यात..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- जिल्ह्यातून एक बातमी समोर आली आहे. अजय महाराज बारस्कर यांच्या...