अहमदनगर। नगर सहयाद्री
लोकसभेच्या पाशवभमीवर भाजप, काँग्रेससह राज्यातील विविध पक्षांनी कंबर कसली आहे. काँग्रेसच्या बुडत्या जहाजातून महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला आहे. यांच्यानंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा सुरू आहेत, या पत्रकारांच्या प्रश्नावर उत्तर देताना राष्ट्रवादीचे आमदार प्राजक्त तनपुरे यांनी आपल्या मनातलं बोलत भाजपाला टोला लगावला आहे.
चाभी तालुक्यातील मिरी-तिसगाव बैठीनंतर आमदार तनपुरे यांनी माध्यमांशी संवाद साधला यावेळी ते बोलत होते. राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपमध्ये जाणार असल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. यावेळी जयंत पाटील ‘सगेसोयरे’ यांना घेऊन जाणार का? असा प्रश्न पत्रकारांनी जयंत पाटील यांचे भाचे आमदार प्राजक्त तनपुरे यांना केला.
आमदार तनपुरे म्हणाले, जयंत पाटील यांनी या चर्चांचे खंडन केलं आहे. आम्ही शरद पवार यांच्या सोबतच आहोत आणि भविष्यात देखील राहणार आहोत, भाजप दावा करत आहे की निवडणुकीत आम्ही सर्वाधिक जागा जिंकू तर भाजपने सांगावे की त्याचे मूळ लोक आहेत हे त्यांनी सांगावं. आमच्याकडून त्यांच्याकडे गेलेले किती लोक आहेत, हेही पहावं अस म्हणत प्राजक्त तनपुरे यांनी सरकारवर निशाणा साधला.
पुढे बोलताना ते म्हणाले, केंद्र सरकारच्या जलजीवन योजनेचा हर या जलऐवजी केवळ प्रचार करण्याचा हेतू तूदिसत आहे. अनेक ठिकाणी जलजीवन योजनेचे चुकीचे सर्वेक्षण झालेले आहे. हे चुकीचे काम करणाऱ्यांना काळ्या यादीत टाका अथवा निलंबीत करा. जलजीवन योजना सौर उर्जेवर आधारित केली असती मोठा उपयोग झाला असता.
मात्र, सरकार याप्रश्नी संवेदनशील दिसत नाही. सरकार आपली उर्जा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात खर्च करतांना दिसत असल्याचा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला. सरकार आपली उर्जा दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यात खर्च करतांना दिसत असल्याचा टोला देखील त्यांनी सरकारला लगावला.