spot_img
अहमदनगरनगरमधून विधानसभा लढवणार का? भाजप नेत्या पंकजा मुडेंचे एका वाक्यात उत्तर, पहा...

नगरमधून विधानसभा लढवणार का? भाजप नेत्या पंकजा मुडेंचे एका वाक्यात उत्तर, पहा काय म्हणाल्या..

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री
कार्यकर्त्यांनी पराभवाने खचून जाऊ नये. भावनाविवश होऊन कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये. येथील भाजपच्या शहर जिल्हाध्यक्षांनी मी येथून विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे त्याचे मी आभार मानते; परंतु यावर माझे कोणतेही मत नाही असे प्रतिपादन भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केले. भाजप नेत्या पंकजा मुंडे या आज संभाजीनगरहून आष्टीकडे जात असतांना नगरमध्ये त्यांचे स्वागत करण्यात आले, त्यावेेळी त्या बोलत होत्या.

यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा उपाध्यक्ष दीपक दहीफळे, युवा नेते नितीन शेलार, कैलास गर्जे, बंटी ढापसे, सरपंच अमित आव्हाड, सार्थक आंधळे, सरपंच बापू आव्हाड, वैभव झोटिंग अतुल गिते, सतीश ढाकणे, संकेत डोळे, सतीश घोडके, किशोर बडे, सौरभ सानप, विजय भालेकर, ज्ञानेश्वर आव्हाड, सुजल आंधळे, रविराज आव्हाड, युवराज शिरसाठ आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

लोकसभेच्या निवडणुकानंतर पंकजा मुंडे या प्रथमच नगरला आल्या होत्या. यावेळी कार्यकर्त्यांनी आपला पराभव जरी झाला तरी तुम्हीच आमचे नेतृत्व, तुम्हीच आमचे सरकार असे म्हटले. आपल्या भविष्यातील पदाकडे आमचे लक्ष लागले आहे, अशी भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पाच हजार युवकांचे ‘शिवनेरी’ किल्ल्यावर ‘श्रमदान’; आ. सत्यजित तांबे म्हणाले, ‘या’ विचारांचे ब्रँड अँबेसिडर व्हा

संगमनेर। नगर सहयाद्री:- संपूर्ण देशासाठी आदर्श असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी उभारलेल्या गड किल्ले यांच्या...

अजितदादांना धक्का? विधानसभेपूर्वी ‘बड्या’ नेत्याने दिला राजीनामा!

अहमदनगर । नगर सहयाद्री:- आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या शिवस्वराज्य यात्रेने...

धारदार हत्याराने तरूणावर हल्ला! नगरसेवक विजू पठारे यांच्या ऑफीसवर नेमकं काय घडलं?

अहमदनगर । नगर सहयाद्री:- वेल्डिंगचे काम करण्यासाठी गेलेल्या तरूणाला जातीवाचक शिवीगाळ करून लाकडी दांडके, लोखंडी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या जीवनातील अत्यंत सुंदर दिवस?, काय घडणार….

मुंबई । नगर सह्याद्री - मेष राशी भविष्य जोडीदाराबरोबर योग्य तो ताळमेळ साधल्यास तुमच्या घरी सुख-समृद्धी...