spot_img
अहमदनगरमहाविकास आघाडीचा फुगा फुटणार? तुम्ही तारीख लिहून ठेवा! देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त...

महाविकास आघाडीचा फुगा फुटणार? तुम्ही तारीख लिहून ठेवा! देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला विश्वास

spot_img

पुणे । नगर सहयाद्री
येथे भाजपच्या महाअधिवेशनात बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला स्पष्ट बहुमत मिळणार असल्याचा विश्वास व्यक्त केला. विरोधकांनी लोकसभा निवडणुकीत पसरवलेल्या खोट्या नॅरेटिव्हचा विधानपरिषद निवडणुकीत फुगा फुटल्याचं सांगत, फडणवीस यांनी कार्यकर्त्यांना तारीख ठेऊन ठेवण्याची सूचना दिली. यावेळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, गिरीष महाजन, आशिष शेलार, पंकजा मुंडे आदी नेते उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, “आता चातुर्मास सुरू होतो आहे, जो तपश्चर्येचा काळ असतो. आम्ही संपर्क, संवाद आणि तपश्चर्येचा उपयोग करणार आहोत. २०१३ मध्ये पुण्यात झालेल्या अधिवेशनानंतर २०१४ मध्ये आपलं सरकार आलं होतं. आता देखील या ठिकाणी घेतलेल्या अधिवेशनात आम्ही दाव्याने सांगतो, की आगामी विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार येईल.

फडणवीस यांनी विरोधकांवर टीका करताना सांगितले की, “पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आरक्षणाची सीमा वाढवली असली तरी विरोधकांनी खोटा नॅरेटिव्ह तयार केला. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या खोट्या दाव्यांना खोडा घालायला सुरुवात केली आहे.खोटं फार काळ टिकत नाही. खोट्याचा फुगा आम्ही फोडायला सुरुवात केली आहे. विधानपरिषद निवडणुकीत आम्ही त्यांच्या फुग्याला टाचणी लावण्याचं काम केलंय. हे म्हणत होते की, महायुतीचे आमदार फुटणार अरे तुमचे २० कधी फुटले हे तुम्हाला कळले नाही, असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लगावला

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार यांना सवाल
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात वातावरण चांगलंच तापलंय. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर आरक्षणाच्या मुद्द्यावरून हल्लाबोल केलाय. ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, तर शरद पवार चारवेळेस मुख्यमंत्री झाले, त्यांनी आरक्षण का नाही दिलं? असं म्हणत फडणवीसांनी थेट शरद पवारांनाच सवाल केला आहे.

मराठा समाजाला आरक्षण ओबीसीत आरक्षण देण्यासाठी उद्धव ठाकरे, शरद पवार आणि नाना पटोले तुमचं समर्थन आहे का? असा सवाल फडणवीसांनी केलाय. तसंच त्यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर दुटप्पी भूमिका सोडण्याचं आवाहन शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना केलंय. पमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर जोरदार निशाणा साधलाय.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

महिला कॅन्सर तपासणी शिबिराचा उद्यापासून शुभारंभ; राणीताई लंके यांची संकल्पना

  टाकळी ढोकेश्वर गटातून शिबिराला सुरुवात; खा. लंके राहणार उपस्थित/सरपंच प्रकाश गाजरे यांची माहिती पारनेर /...

जेऊर ग्रामस्थांचा गणपती विसर्जन न करण्याचा निर्णय; काय म्हणाले पोलीस…

गोरक्षक हल्ल्यातील आरोपींना अटक करण्याची ग्रामस्थ, मंडळांची मागणी अहमदनगर | नगर सह्याद्री सोमवारी रात्री जेऊर येथील...

धक्कादायक! गणपती विसर्जन मिरवणुकीत सापडली घातक शस्त्रे, पुढे घडले असे…

  अहमदनगर | नगर सह्याद्री विघ्नहर्ता गणेशाच्या शांततेत चालणार्‍या विसर्जन मिरवणुकीला गालबोट लावण्याचा प्रयत्न पोलिसांच्या सतर्कतेमुळे...

ठरलं! नगरमध्ये कोतकरांचं अन् श्रीगोंद्यात साजनचं!

नगर शहरात जगताप विरुद्ध कोतकर पुन्हा एकदा उभे ठाकणार तर पारनेरमध्ये आघाडीकडून राणीताई लंकेच! मोरया...