spot_img
ब्रेकिंगअतिक्रमणांमुळे अडले लिंक रोडचे काम! बांधकाम विभाग हातोडा टाकणार का? केडगावकरांचा सवाल

अतिक्रमणांमुळे अडले लिंक रोडचे काम! बांधकाम विभाग हातोडा टाकणार का? केडगावकरांचा सवाल

spot_img

शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याचे हॉटेल अन माजी नगरसेवकाचे कार्यालय ठरतेय अडथळा
अहमदनगर | नगर सह्याद्री:-
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर नगर शहरासह उपनगरांमध्ये मोठ्या प्रमाणात विकास कामे सुरु झाली आहेत. पुणे महामार्गापासून ते कल्याण महामार्गास जोडणार्‍या लिंक रोडचे काम सुरु आहे. परंतु, लिंकरोडच्या कामास शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याचे हॉटेल अन माजी नगरसेवकाचे कार्यालय अडथळा ठरत आहे. येथील अतिक्रमित बांधकामावर महापालिका प्रशासन तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग हातोडा टाकणार का असा रोकडा सवाल केडगावकरांकडून उपस्थित केला जात आहे.

नगर शहरात मोठ्या प्रमाणात रस्त्यांची कामे सुरु आहेत. केडगाव येथील लिंक रोडचे काम ४५ कोटींचे असून संपूर्ण रस्ता काँक्रीटकरण होणार आहे. या रस्त्याचे काम झाल्यानंतर बाहेरील वाहतूक नगर शहरात न येता बाहेरुनच जाणार आहे. लिंक रोडच्या रस्त्याचे काम सुरु असून या रस्त्याच्या कामास शिवसेनेच्या माजी पदाधिकार्‍याचे हॉटेलचे अतिक्रमण आणि माजी नगरसेवकाचे कार्यालय अडथळा ठरत आहे.

पुणे महामार्गापासून कल्याण महामार्गाकडे जाण्यासाठी केडगावमधून लिंक रोड तयार करण्यात आला आहे. या रस्त्याची दुरावस्था झाली होती. परंतु, सध्या या संपूर्ण लिंक रोडचे काँक्रीटीकरणाचे काम सुरु आहे. तसेच डे्रेनेज लाईनचेही काम सुरु आहे. रस्त्यालगत असलेली अतिक्रमणे काढण्यात आली आहेत. परंतु, याच रस्त्याच्या कामात एका बाजूला एका माजी नगरसेवकाचे कार्यालय असलेले बांधकाम अडथळा ठरत आहे.

बांधकामामुळे ड्रेनेज लाईनचे काम रखडले आहे. तर दुसर्‍या बाजूला शिवसेनेचा माजी पदाधिकार्‍याचे हॉटेलचे बांधकाम अडथळा ठरत आहे. महापालिका व सार्वजनिक बांधकाम विभाग सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवर तातडीने कारवाई करते. परंतु, धनदांडग्यांच्या अतिक्रमीत बांधकामांवर कारवाई करण्यास धजावत नाही. सर्वसामान्यांच्या अतिक्रमणांवरच कारवाई का असा सवाल केडगावकरांकडून उपस्थित केला जात आहे. त्या दोघांच्या अतिक्रमणाला कोणाचे अभय आहे. रस्त्याच्या कामासाठी दोघांचेही अतिक्रमण पाडले जाणार का असा सवाल उपस्थित केला जात आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आजचे राशी भविष्य ‘या’ राशींसाठी व्यावसायिकांना आजचा दिवस…

मुंबई । नगर सहयाद्री:- मेष राशी भविष्य इच्छा आशीर्वाद म्हणून पूर्ण होतील आणि उत्तम नशिब फळफळेल...

Politics News:”मंत्री विखे पाटील यांच्या नियोजनामुळे अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण”

Politics News: संगमनेर, निळवंडे कालव्यांचे पाणी आल्याने अनेक वर्षांचे स्वप्न पूर्ण होत आहे. पालक...

Ahmadnagar Politics:नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का! तालुकाप्रमुख ‘कमळ’ हाती घेणार?

Ahmadnagar Politics: नगर जिल्ह्यात शिवसेनेला धक्का बसला आहे. जामखेड शिवसेना तालुकाप्रमुख (उबाठा) संजय काशिद...

साकळाई योजनेसाठी शेतकरी आक्रमक; कृती समितीचा पुढाऱ्यांवर हल्लाबोल, पाचपुते यांनीच केला घोळ…, शेलार, कार्ले, हराळ काय म्हणाले पहा…

'साकळाई'च्या आड येणारे झारीतील शुक्राचार्य ओळखा कृती समितीचा खडकी येथे रास्तारोकोत इशारा | सिंचनभवनवर मोर्चा...