अहमदनगर। नगर सहयाद्री-
राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह दिले आहे. ही तुतारी वाजणार का? फक्त हवाच निघणार हे निवडणुकीत पाहू अशा शब्दात खासदार सुजय विखे पाटील यांनी शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं आहे.
राष्ट्रवादी मध्ये दोन गट पडल्यानंतर पक्षाचे नाव व चिन्ह हे अजित पवार यांना देण्यात आले. त्यानंतर शरद पवार गटाला कोणते चिन्ह मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. आता केंद्रीय निवडणूक आयोगाने शरद पवार गटाला तुतारीवाला माणूस हे चिन्ह दिल आहे. शरद पवार गट आता या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार असं नाव आणि तुतारीवाला माणूस हे चिन्ह शरद पवार गटाकडे असणार आहे.
खासदार विखे पाटील नेमकं म्हणाले काय?
जलजीवन मिशनमधील कामांचे टेंडर, ठेकेदार नियुक्ती व वर्कऑर्डरचे काम महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाले आहे. त्यांनाच मलिदा गेला आहे. सत्तांतरानंतर त्यांचा हिशेब कोलमडल्याने ते तक्रारी करीत आहेत, काळातच या योजनेचा आराखडा मंजूर झाला होता. त्यावेळी त्यांनी नियुक्त केलेल्या ठेकेदारांबर आम्ही आक्षेप घेतले नाही. सत्तांतरानंतर आम्ही नवे ठेकेदार नेमू शकलो असतो. पण आमची ती नीतीमत्ता नाही. अशा शब्दात आ. प्राजक्त तनपुरे यांच्या आरोपांना खासदार विखे पाटील यांनी उत्तर दिले.
राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाने तुतारी वाजवणारा माणूस असे चिन्ह दिले आहे. ही तुतारी वाजणार का? फक्त हवाच निघणार, हे निवडणुकीत पाहू, अनेक पक्ष असतात व त्यांना अनेक चिन्ह मिळत असतात, त्यावर अनेकदा हरकतीही दाखल होतात. यामुळे पवार यांच्या तुतारीबरही एखादी हरकत दाखल होऊ शकते. त्यामुळे एकदा सारे क्लिअर होऊ द्या, त्यानंतर तुतारीतून आवाज निघणार हे कळेलच अशा शब्दात खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केली
शरद पवार गटावर टीकास्त्र सोडलं.